कंगाल पाकड्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की; विमान उड्डाणासाठी इंधनाचेही पैसे नाहीत…

दहशतवाद्यांचे सुरक्षिच आश्रयस्थान अशी ओळख असलेल्या पाकिस्तानवरच आता दहशतवाद उलटला असून त्यांची आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही नाचक्की होत आहे. आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेला पाकिस्तान आणखी रसातळाला जात आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स आता बुडीत निघण्याची शक्यता आहे. या एअरलाइन्सकडून जी उड्डाणे सुरू आहेत, ती सुरू ठेवण्यासाठी विमानात इंधन भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. इंधनाचे पैसे न भरल्यामुळे पाकिस्तानचा मित्र देश असलेल्या यूएईने पाकिस्तानच्या विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे.

कंगाल झालेल्या पाकिस्तानकडे आता विमानाच्या इंधानाचेही पैसे नाहीत. तसेच सरकारी विमान कंपनीने कर्मचाऱ्यांनाही त्यांचे वेतन दिलेले नाही. विमान सेवा सुरू राहण्यासाठी आपत्कालीन निधी मिळाला नाही, तर विमानसेवा 15 सप्टेंबरपासून बंद होऊ शकतात, असे सरकारी एअरलाइन्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याआधी एअरलाइन्सकडून दिवसाला 23 उड्डाणे होत होती. आता आर्थिक तंगीमुळे फक्त 16 उड्डाणे होत आहेत. तसेच या संकटामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागत आहे. त्याचप्रमाणे पैसे भरणे शक्य नसल्याने विमान बनवणाऱ्या कंपन्यांनी बोइंग आणि एअरबसचे सुटे भाग देण्यास मनाई केली आहे. या सर्व कारणांनी विमाने उड्डाणांवर बंधने येत आहेत त्यामुळे एअरलाइन्स तोट्या त असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

या कंगाल स्थितीमुळे पाकिस्तानची परदेशात नाचक्की होत आहे. इंधनाचे पैसे दिले नसल्याने सौदीच्या दमन विमानतळावर एक विमान थांबण्यात आले होते. तसेच चार विमाने दुबईच्या विमानतळावर अडवण्यात आली होती. एअरलाइन्सने इंधनाचे पैसे देण्याचे लेखी आश्वासने दिल्यानंतरच ही विमाने सोडण्यात आली. तसेच इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट एसोसिएशनला पाकिस्तानने 35 लाखा डॉलर तातडीने भरले. त्यामुळे एअरलाइन्सच्या विमानसेवा सुरू आहेत, असेही अधिकाऱ्याने सांगितले. चे आपत्काली