
‘आशाताई केवळ असाधारण कलाकार होत्या असं नव्हे, तर माणूस म्हणून त्या ‘बेहतरीन’ होत्या. त्या किती महान होत्या हे सर्वांनाच माहीत आहे. मी वेगळं काय सांगणार? त्यांना जन्नत मिळो एवढीच दुवा मी अल्लाहकडे करतो…’
हे उद्गार आहेत पाकिस्तानचे दिग्गज गझल गायक गुलाम अली यांचे. आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त कळताच फेसबुकवर व्हिडीओ शेअर करून गुलाम अली यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना ते भावुक झाले. ‘आशाताई प्रत्येक कलाकाराचा आदर करायच्या. सोबतच्या कलाकाराकडून जास्तीत जास्त चांगलं काम कसं होईल यासाठी त्या प्रयत्न करायच्या,’ असे गुलाम अली म्हणाले.
























































