
सामना ऑनलाईन । इस्लामबाद
पाकिस्तानचे चलन रुपया कोसळल्याने गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. पाकिस्तानचा शेअरमार्केटमध्ये शेअर्स 800 अंकांनी कोसळला. त्यामुळे पाकिस्तानी गुंतवणुकदारांचे एक हजार कोटी बुडाले. कंगाल पाकिस्तानपुढे यामुळे अजून आर्थिक पेच वाढला आहे. पुढेही रुपया सावरणार नाही अशी शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये महागाई पुन्हा वाढणार आहे.
पाकिस्तान कच्च्या तेलासाठी दुसर्या देशांवर अवलंबून आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूही पाकिस्तान इतर देशांकडून निर्यात करतं. अशा वेळी पाकिस्तान सरकारला निर्यात केलेल्या वस्तू अजून महाग पडणार, परिणामी देशात महागाईचा दर अजून वाढेल.
पाकिस्तानचे मुख्य वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून जे पॅकेज मिळाले आहे त्यामुळे चलनावर दबाव वाढला आहे. तसेच सरकार आणि नाणे निधीमध्ये काय करार झाला याची माहिती न मिळाल्याने गुंतवणुकदार आणि उद्योजकांध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे डॉनने म्हटले आहे.

























































