विजयानंतरही पाकिस्तानचे पॅकअप, बांगलादेशचा शेवट कडू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pakistan-world-cup-2019

सामना प्रतिनिधी । लॉर्डस्

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमधील सेमी फायनलच्या चौथ्या संघाचे नाव शुक्रवारी निश्चित झाले. पाकिस्तानला बांगलादेशवर ‘महाविजय’ मिळवता आला नसल्यामुळे विजयानंतरही त्यांचा स्पर्धेतील खेळ खल्लास झाला. यामुळे केन विल्यमसनच्या न्यूझीलंडचा अंतिम चार संघांमध्ये प्रवेश झाला. आता हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यानंतर सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारा न्यूझीलंड हा चौथा संघ ठरला. याचसोबत 1992 च्या वर्ल्ड कपची पुनरावृत्ती करण्याच्या पाकिस्तानच्या स्वप्नांना सुरुंग लागला. पाकिस्तानने 94 धावांनी बांगलादेशला धूळ चारली. पाकिस्तानने स्पर्धेतील पाचवा विजय मिळवला तर बांगलादेशला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

शाहीन आफ्रिदीचे सहा बळी

पाकिस्तानकडून मिळालेल्या 316 धावांचा पाठलाग करणाऱया बांगलादेशला 221 धावाच करता आल्या. पाकिस्तानचा डावखुरा तेज गोलंदाज शाहीन आफ्रिदीने 35 धावा देऊन सहा फलंदाज बाद केले. बांगलादेशकडून शाकीब अल हसनने 64 धावा केल्या. शाहीनलाच लढतीतील मॅन ऑफ दि मॅच पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याने न्यूझीलंडविरुद्धही अशीच कामगिरी केली होती.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान : इमाम हिटविकेट गो. मुस्तफिजुर 100, बाबर पायचीत गो. सैफुद्दीन 96, इमाद झे. महमुद्दूलाह गो. मुस्तफिजुर 43. अवांतर ः 16. एकूण 50 षटकांत 9 बाद 315. गोलंदाजी – मुस्तफिजुर – 10-0-75-5, सैफुद्दीन 9-0-77-3.

बांगलादेश: शाकीब झे. अहमद गो. शाहीन 64. अवांतरः 11. एकूण 44.1 सर्व बाद 221. गोलंदाजी – शाहीन 9.1-0-35-6.

विजयी संघ : पाकिस्तान

मॅन ऑफ दि मॅच : शाहीन आफ्रिदी पाकिस्तान