
हिंदुस्थानने जैलसलमेरमध्ये पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यातील पायलटला ताब्यात घेण्यात आले आहे. अद्याप या पायलटबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या पायलटचा पहिला फोटो समोर आला आहे.
गुरुवारी साडेच्या सुमारास पाकिस्तानने हिंदुस्थानच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली. मात्र हिंदुस्थानच्या संरक्षण दलाने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे अनेक ड्रोन व तीन लढाऊ विमाने पाडली. या लढाऊ विमानातील एका पायलटला जखमी अवस्थेत जैसलमेरमधून जवानांनी ताब्यात घेतले.