महिलांनी तोकडे कपडे घातल्यामुळे बलात्कार वाढले, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे वादग्रस्त वक्तव्य

स्त्रियांनी तोकडे कपडे घालू नये, त्यामुळे बलात्कारसारखे गुन्हे वाढतात असे वादग्रस्त वक्त्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे. तसेच यासाठी पडदा संस्कृती महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यारून वाद निर्माण झाला असून चौफेर टीका होत आहे.

एका वाहिनीला मुलाखत देताना इम्रान खान म्हणाले की, महिलांनी तोकडे कपडे घालू नये, महिलांनी तोकडे कपडे घातल्यास पुरुष चाळवले जातात. आम्ही ज्या समाजात राहतो तो संपूर्ण वेगळ्या प्रकारचा समाज आहे इथे सांस्कृतिक साम्राज्यवाद आहे. यासाठी पडद पद्धत महत्त्वाची आहे. महिलांनी छोटे कपडे घातले तर त्याचा पुरुषांवर प्रभाव पडतो असेही खान म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. लेखिका तस्लिमा नसरीन यांनी इम्रान खान यांचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. तसेच जेव्हा पुरुष कमी कपडे घालतात तेव्हा स्त्रियांवरही प्रभाव पडतो असा टोमणा मारला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या