देर आये, दुरुस्त आये! पाकिस्तान सरकारची वेबसाईट म्हणतेय POK हिंदुस्थानचेच

2707

पाकिस्तान सरकारने कोरोना विषाणूबाबत माहिती देण्यासाठी एक वेबसाईट बनवली आहे. यात पाकिस्तानने कब्जा केलेला कश्मीरचा भाग हिंदुस्थानचा असल्याचा दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे पीओकेवर पाकिस्तान सतत आपला अधिकार असल्याचे सांगतो आणि पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इथे निवडणुका घेण्याचे आदेशही दिले होते. यावर हिंदुस्थानने तीव्र विरोध व्यक्त केला होता. आता मात्र पाकिस्तानच्या अधिकृत वेबसाईटनेच पीओके हिंदुस्थानचा भाग असल्याचे दाखवले आहे.

पाकिस्तान सरकारने बनवलेल्या covid.gov.pok नावाच्या वेबसाईटवर बनवण्यात ग्राफिक्समध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा भाग दाखवण्यात आला आहे. यात पीओके हिंदुस्थानचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानी युजर्सने सरकारला ट्रोल केले आहे. तर हिंसुस्थानी युजर्सने ‘देर आये, दुरुस्त आये’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

untitled-32_1590054060

याआधी हिंदुस्थानने 8 मे पासून पीओके, गिलगिट आणि बाल्टिस्तानच्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली. याच्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने लडाख, पुलवामा, जम्मू भागाच्या हवामानाची भविष्यवाणी वर्तवण्यास सुरुवात केली. मात्र पहिल्याच दिवशी पाकिस्तानने आपले उसे करून घेतले. पाकिस्तानने येथील किमान तापमान – 4 डिग्री आणि कमाल तापमान – 1 डिग्री सांगितले. यावरून त्यांना ट्रोल करण्यात आले.

लवकरच ‘POK’वर तिरंगा अभिमानाने फडकताना दिसेल, भाजप मंत्र्यांचे विधान

आपली प्रतिक्रिया द्या