लवकरच ‘POK’वर तिरंगा अभिमानाने फडकताना दिसेल, भाजप मंत्र्यांचे विधान

6355

एकीकडे संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तान मात्र ‘नापाक’ उचापती करण्यात व्यग्र आहे. दहशतवादी कारवाया, सीमेवर दहशतवादी तळ आणि घुसखोरीसाठी हिंदुस्थानी बंकर आणि सीमेवरील गावांवर गोळीबार करत आहे. यावर हिंदुस्थान लष्कर चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहे. आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि यूपी सरकार मधील मंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी लवकरच POK हिंदुस्थानच्या ताब्यात असेल आणि तिथे अभिमानाने तिरंगा फडकेल, असे म्हटले आहे.

जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नामोनिशाण मिटत नाही तोपर्यंत शांतता अशक्य आहे, असे आनंद स्वरूप शुक्ला यांनी म्हटले. पाकिस्तानने कब्जा केलेल्या काश्मीरवर लवकरच हिंदुस्थानचा कब्जा असेल आणि तिरंगा फडकताना दिसेल, असेही शुक्ला म्हणाले.

चीन-पाकिस्तानला खणखणीत इशारा, वायुसेना प्रमुखांनी एका दगडात उडवले दोन पक्षी

याआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू शाहिद आफ्रिदी याने हिंदुस्थान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्द वापरले होते. याला प्रत्युत्तर देताना शुक्ला यांनी आफ्रिदीला झापले होते आणि अशा लोकांकडून चांगल्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले..

आपली प्रतिक्रिया द्या