पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या यादीत सलमान

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने बलुचिस्तानचा उल्लेख स्वतंत्र देश असा केल्याने पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने सलमानला ‘टेरर वॉच लिस्ट’मध्ये टाकले आहे.

पाकिस्तानी गृह खात्याने सलमानचे नाव तेथील दहशतवादविरोधी कायद्यातील चौथ्या परिशिष्टात टाकले आहे. दहशतवाद्यांशी किंवा कट्टरपंथीयांशी संबंधांचा संशय असलेल्या व्यक्तींचा या परिशिष्टात समावेश केला जातो.