पीओकेमध्ये पाकिस्तानी रेंजर्सवर दगडफेक

पाकव्याप्त कश्मीरमध्ये (पीओके) महागाई आणि विजेच्या दराविरोधात निदर्शने थांबायचे नाव घेत नाही. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पीओकेसाठी 23 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे म्हणजेच 718 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.

तरीसुद्धा आंदोलक मागे हटायला तयार नाहीत. मदतीसाठी पॅकेजची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानी रेंजर्सनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या आणि आंदोलकांवर गोळीबार केला.

या काळात 3 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले. मदत पॅकेज अंतर्गत, पीओकेमध्ये पिठाची किंमत 77 रुपये किलो वरून 50 रुपये किलो करण्यात आली आहे. विजेच्या दरातही कपात करण्यात आली. पीओकेमध्ये, 100 युनिटपर्यंतच्या विजेची किंमत 3 रुपये असेल.