बलात्काऱयाला नपुंसक करण्याची शिक्षा, पाकिस्तान करणार कायदा

बलात्कारी व्यक्तीला कठोरात कठोर शासन व्हायला हवे. त्याला फाशीसारखी शिक्षा सुनावली जावी अशी मागणी होत असते. पाकिस्तान सरकारनेही याबाबत मोठा निर्णय घेतला असून बलात्काऱयाला कठोर शिक्षा ठोठाविण्यासाठी कायद्याचा मसुदा तयार केला आहे. या कायद्यात बलात्काऱयाला नपुंसक करण्याची तरतूद करण्यात आाली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान इम्रान खान यांनी या कायद्याला मंजुरी देण्याची तयारी दर्शविली आहे.
इम्रान यांनी बलात्कारी व्यक्ती पुन्हा असा अपराध करण्यास सक्षम राहणार नाही असा कायदा आणण्याचे सूतोवाच केले होते. याआधी बांगलादेश सरकारने बलात्काऱयाला मृत्यूदंड देणाऱया कायद्याला मंजुरी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या