जम्मू-कश्मीरमधून आलेल्या सफरचंदांवर लिहिलेल्या मजकुरामुळे उडाली खळबळ

5350
फाईल फोटो

कलम 370 रद्दबातल केल्याच्या 70 दिवसानंतर जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती शांततेत असतानाच खोऱ्यातून आलेल्या सफरचंदांवर लिहिलेल्या मजकुरामुळे खळबळ उडाली आहे. कश्मीरमधील स्थिती सामान्य होताना दिसत असतानाच खोऱ्यातून आलेल्या सफरचंदांच्या खोक्यात फळांवर लिहिलेला पाकिस्तान समर्थनाचा मजकूर पाहून विक्रेत्यांना धक्का बसला आहे. या सफरचंदांवर बहिष्कार घालण्याचा इशारा फल विक्रेत्यांनी दिली असून याची पोलीस चौकशी करत आहे.

कश्मीमधून फळांच्या पेट्या जम्मूमधील कठुआ येथे विक्रीसाठी दाखल झाल्या. पेट्या उघडताचा सफरचंदांवर पाकिस्तान समर्थानाच्या घोषणा लिहिलेल्या होत्या. मंडईत आलेल्या सफरचंदांवर ‘आम्हाला स्वातंत्र्य हवंय’, ‘आम्ही बुरहाण वाणीवर प्रेम करतो’, ‘झाकीर मुसा परत ये’, ‘मेरी जान इम्रान खान’ अशा घोषणा लिहिलेल्या होत्या. या प्रकरणी सरकारने कारवाई करावी अशी मागणी फळविक्रेत्यांनी घेतली आहे. अन्यथा आम्ही यावर बहिष्कार घालू अशी धमकीही दिली आहे.

apple

दरम्यान, विक्रेत्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपअधिक्षक माजिद महबूब यांनी विक्रेत्यांच्या तक्रारीवरून सफरचंद जब्त केले असून याचा तपास सुरू आहे अशी माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या