
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
गाढवांच्या संख्येच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेला पाकिस्तान आपले दोस्त राष्ट्र चीनला गाढवांची निर्यात करणार आहे. गाढवांच्या या व्यापारातून पाकिस्तानला करोडो रुपयांचे परकीय चलन मिळणार आहे. पहिल्या तीन वर्षांत पाकिस्तान चीनला तब्बल 80 हजार गाढवांची निर्यात करणार आहे.
पारंपरिक औषधांच्या निर्मितीसाठी गाढवांच्या कातडय़ाचा उपयोग होत असल्याने चीनमध्ये गाढवांना फार मोठी किंमत आहे. गाढवांच्या त्वचेपासून सरस, डिंक काढला जातो. या डिंकामध्ये वैद्यकीय घटक आहेत. या डिंकामुळे मानवाची प्रतिकारशक्ती वाढून रक्ताचा पोतही सुधारतो, असे चीनचे वैद्यकशास्त्र सांगते.


























































