पाकिस्तानकडून राजौरीमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन, गोळीबारात एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

सीमाभागात पाकिस्तानच्या कुरापती थांबताना दिसत नसून सोमवारी पुन्हा पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. येथील राजौरी भागात पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. त्याला हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिल्याने सकाळी सवा सातच्या सुमाराला हा गोळीबार थांबला. पण, या चकमकीत हिंदुस्थानी सैन्याच्या एका जवानाला वीरमरण आलं आहे. रायफलमॅन करमजीत सिंग असं या जवानाचं नाव आहे.

पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या हवाई हल्ल्यानंतर सीमाभागात सतत तणावाचं वातावरण आहे. याआधीही हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानच्या कुरापतींच्या प्रत्युत्तरादाखल मेंढर येथील प्रदेशातीला पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या.