AUSvPAK जगज्जेत्यांचे लोटांगण, 60 धावांत 10 फलंदाज बाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । दुबई

दुबईमध्ये सुरू असलेल्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पाकिस्तानच्या वेगवागन गोलंदाजीसमोर लोटांगण घातले आहे. चांगली सलामी मिळाल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला आहे. पहिल्या डावात 482 धावा चोपणाऱ्या पाकिस्तानने 280 धावांची मोठी आघाडी मिळवली आहे.

पाकिस्तानच्या पहिल्या डावातील डोंगराएवढ्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाती सुरुवात दणक्यात झाली. उस्मान ख्वाजा आणि फिंचने 142 धावांची सलामी दिली. फिचने 62 आणि ख्वाजाने 85 धावा ठोकल्या. 142 वर पहिली विकेट गमावल्यानंतर पुढच्या 60 धावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ बाद झाला. यात सात खेळाडूंना तर दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. पाकिस्तानकडून बिलाल आसिफ आमि मोहम्मद अब्बासने धारधार गोलंदाजी केली. बिलालने बळींचा षटकार तर अब्बासने बळींचा चौकार लगावला.