पाकिस्तानमध्ये इंग्लंडची फतेह! 22 वर्षांनंतर कसोटी जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाहुण्या इंग्लंडने पहिल्या कसोटीत यजमान पाकिस्तानवर 74 धावांनी मात केली. इंग्लंडचा पाकिस्तानमधील हा केवळ तिसरा कसोटी विजय असून तब्बल 22 वर्षांनंतर इंग्लंडने पाकिस्तानमध्ये कसोटी सामना जिंकलाय.   या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावाला खिंडार पाडणारा ओली रॉबिन्सन (50/4) या कसोटीचा मानकरी ठरला.

इंग्लंडच्या चार फलंदाजांनी पहिल्याच दिवशी झळकाविलेली चार शतके, पाकिस्तानच्या तीन फलंदाजांनी शतके ठोकून दिलेले दमदार प्रत्युत्तर आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे कसोटी संस्मरणीय ठरली.

इंग्लंडने 657 धावांचा डोंगर उभारल्यानंतर पाकिस्ताननेही 579 धावसंख्या उभारल्याने पाहुण्या संघाला पहिल्या डावात केवळ 78 धावांची सलामी मिळविता आली. त्यानंतर इंग्लंडने 7 बाद 264 धावांवर दुसरा डाव घोषित करण्याचा धाडशी निर्णय घेत पाकसमोर 343 धावांचे लक्ष्य ठेवले. कालच्या 3 बाद 80 वरून पुढे खेळताना  इमाम-उल-हक (48), सौद शकील (76), मोहम्मद रिझवान (46) व सलमानने (30) झुंज दिली. पण त्यांचा संघ 268 धावांवर आटोपला.