पाकड्यांची फेकाफेकी, ट्विटरवर ट्रेंड सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकड्यांचा चांगलाच तिळपापड झाला आहे. आता पाकिस्तानने जुने फोटो रीपोस्ट करून फेकाफेकी सुरू केली आहे. हिंदुस्थानी ट्विटर युसर्सनी त्यांचे हे दावे पोकळ ठरवून पाकड्यांना त्यांची जागा दाखवली आहे.

पाकिस्तान लष्कराने हिंदुस्थानचे एक विमान पाडल्याच्या फुशारक्या मारल्या आणि त्याचे फोटो व्हायरले केले होते. परंतु हे विमान जून २०१६ मधे जोधपूरमध्ये कोसळले होते त्याचे पुरावे हिंदुस्थानने दिल्याने पाकडे पुन्हा तोंडावर पडले आहेत.

हिंदुस्थानचे अजून एक विमान पाडल्याचा पाकिस्तानच्या माध्यमांनी दावा केला. परंतु हे विमान ओडिशामध्ये कोसळले होते. त्याचेच जुने फोटो पाकिस्तानच्या लोकांनी ट्विटरव टाकले. हिंदुस्थानने पुरावे दाखवऊन हे दावेहे खोटे पाडले आहेत.

हिंदुस्थानी वायुदलाचा दुसरा पायलट पकडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. त्याचे फोटोही पाकिस्तानने सोशल मीडियावर टाकले आहेत. परंतु हा जखमी पायलटचा व्हिडीओ जुना असल्याचा हिंदुस्थानी ट्विटर युजर्सने सिद्ध केले आहे. तसेच पाकिस्तान किती अज्ञानी आहे हे जगाच्या निदर्शनास आणले आहे.