पाकड्यांनी दहशतवाद्यांच्या यादीतून 4000 नावे वगळली; मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराचाही समावेश

553
प्रातिनिधीक फोटो

पाकिस्तानने दीड वर्षात दहशतवाद्यांच्या यादीतून सुमारे 4000 दहशतवाद्यांची नावे वगळली आहेत. तर गेल्या दीड महिन्यात 1800 दहशतवाद्यांची नावे यादीतून हटवण्यात आली आहेत. या यादीतून मुंबईत 2008 साली झालेल्या दहशदवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर झाकी उर रहमान लख्वी याचे नावही यादीतून हटवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी प्राधिकरणाने गुपचूप दहशतवाद्यांची नावे यादीतून वगळल्याचे एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

लख्वीवर ऑस्ट्रेलिया, यूरोपीय यूनियन, फ्रान्स, इंटरपोल, रशिया, स्विर्त्झलँड, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी त्याला फरारी दहशतवादी घोषित केले असून त्याच्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. आर्थिक गैरव्यवहारांवर देखरेख ठेवणारी एफएटीएफ संस्था लवकरच पाकिस्तानतल्या दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याविषयीचा पुन्हा एकदा आढावा घेणार होती. या संस्थेने पाकिस्तानचा समावेश ग्रे लिस्टमध्ये केला आहे. या लिस्टमधून बाहेर पडण्यासाठीच पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांची नावे यादीतून वगळल्याने अहवालात म्हटले आहे. इमरान सरकारकडून ही नावे वगळण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पाकिस्तानच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी प्राधिकरणाने तयार केलेल्या यादीत 2018 ला 7 हजार 600 जणांचा समावेश होता. मात्र गेल्या दीड वर्षात पाकिस्तानने या यादीतल्या दहबशतवाद्यांची नावे वगळण्यास सुरुवात केल्यानंतर आता या यादीत केवळ 3 हजार 800 जणांची नावे शिल्लक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या