
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिच्या फॅशन सेन्स चाहत्यांना प्रचंड आवडतो. नुकतेच तिने इंस्टाग्रावर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तीने डिप-व्ही नेकलाइन ऑलिव्ह ग्रीन एम्ब्रॉयडर्ड पॅचवर्क अनारकली घातला आहे. या एथनिक विंटेज लुक पूर्ण करण्यासाठी पलकने हेव्ही गोल्डन झुमके, डायमंड गोल्ड कडे घातले आहेत. तसेच या लूकवर न्यूड/नॅचरल मेकअप केला आहे.तसेच या ड्रेसवर पलकने फ्रिझी हेअर स्टाइल केली आहे. तिच्या या मनमोहक स्टाईलने सध्या सर्वांचेच लक्ष वेधले आहे.




























































