पालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

1884

पालघरमधे 40 वर्षीय महिलेचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालघर मधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 2 वर गेली. मंगळवारी सफाळेतील रूग्णाचा काल मृत्यु झाला. ही महिला कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या कुटुंबातील असल्याचे समजते.

31 तारखेला पालघरमधे कोरोनाचा पहिला बळी गेल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 20 जणांना कोरंटाईन करण्यात आले आहे. त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींच्या थुंकीचे सॅम्पल चाचणीसाठी पाठवण्यात आली होती. प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने तथा कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता म्हणून दि. 31 मार्च ते 7 एप्रिल 2020 रोजी रुग्णाचा वावर असलेला संपूर्ण परिसर 8 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या