पालघर – पिकअप-टेम्पोचा अपघात, 1 ठार तर 9जखमी

1724

डहाणू चारोटी रोडवर पिकअप आणि कामगार वाहून नेणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर नऊ जण गंभीर जखमी आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.

वाणगाव जवळील वाढणान येथील मिरचीच्या वाडीत काम करून तलावली येथे घरी परतत असताना रानशेत येथे अपघात घडला. जखमींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या