
पालघर जिह्यातील गडचिंचले गावात दोन साधु व त्यांच्या ड्रायव्हरच्या हत्येच्या खटल्याच्या सुनावणीमध्ये विशेष सरकारी वकिल म्हणून अॅड. सतीश माने-शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालघर जिह्यात सुशील गिरी महाराज व चिकणे महाराज या साधूंची हत्या झाली होती. गुरुंच्या अत्यंसंस्कारासाठी दोन्ही साधु मोटारीतून सूरतकडे निघाले होते. पोलिसांनी या प्रकरणी 110 आरोपींना अटक केली आहे. गावात मुले पळवणाऱयांची टोळी शिरल्याची अफवा पसरली होती. या साधूंना चोर समजून या साधूंची हत्या केल्याचे उघड झाले.
या प्रकरणी आतापर्यंत एपूण पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले असून 35 पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर जिह्याचे पोलीस अधिक्षक गौरव सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.































































