पालघर नगरपरिषद निवडणुकीत 11.30 वाजेपर्यंत 25 टक्के मतदान

109

सामना ऑनलाइन । पालघर

पालघर नगरपरिषद निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी 62 मतदान केंद्र उभारण्यात आली असून 47 हजार 850 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण 14 प्रभागांमधील 28 जागेसह एक नगराध्यक्ष अशा एकूण 29 जागांसाठी मतदान होत आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. सकाळी 9.30 वाजेपर्यंत 10.94 टक्के मतदान झाले आहे. तर सकाळी 11.30 वाजेपर्यंत 25.37 टक्के मतदान झाले आहे. जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहनन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे. निवडणुकीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी संचलन केले.

रायगड जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतीसाठी मतदान

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनमधील आराठी, काळीजे, दांडा (बागमांडला), शिरस्ते, गौळवाडी, नागलोली, हरेश्वर, भोस्ते, वडवली, बोर्ली पंचतन, वेळास, मारळ, पनवेल- चिपळे, कुंडेवहाळ, कर्नाळा, कर्जत – शिरसे, पाथरज, उरण -बांधपाडा येथे तर खालापूरमधील उंबरे, माणगावमधील सणसवाडी अशा एकूण 20 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. सोमवारी 25 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या