
राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी लागाला. यामध्ये पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने जबरदस्त कामगिरी केली. 18 जागांवर दणदणीत विजय मिळवत शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरली आहे. मात्र त्याचवेळी भाजपला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
नाग’पुरात’ भाजपच्या गटांगळ्या, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विजयाचा पूर
याधी जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असताना भाजपचे संख्याबळ 21 होते ते आता 10 पर्यंत खाली आले आहे. तर शिवसेनेचे संख्याबळ अपक्ष धरून 17 होते ते आता 18 वर पोहोचले आहे. राष्ट्रवादीचे संख्याबळ 4 वरून 15 झाले आहे. काँग्रेसचे संख्याबळ 1 इतके होते. त्यांनी आपले संख्याबळ यंदाही कायम ठेवले आहे. भाजपच्या 11 जागा घटल्याने जिल्ह्यात पक्षाची ताकद कमी झाली आहे.
सहापैकी 4 जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा; धुळे भाजपकडे, अकोल्यात त्रिशंकू
जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार
पालघर
तारापूर – प्रकाश निकम (शिवसेना)
दांडी – वैदेही वाढाण (शिवसेना)
पासथळ – मंगेशा भाईर (शिवसेना)
बोईसर-काटकरपाडा- महेंद्र भोणे (भाजप)
वंजारपाडा – चेतन धोडी (भाजप)
सरावली – पोर्णिमा धोडी (शिवसेना)
खैरापाडा – शितल धोडी (राष्ट्रवादी)
शिगांव खुताड – भावना विचारे (बवीआ)
बऱ्हाणपूर – प्रतिभा गुरोडा (शिवसेना)
मनोर – विष्णू कडव (बवीआ)
सावरे ऐंबूर – विनया पाटील (शिवसेना)
नंडोर- देवखोप – अनुश्री पाटील (भाजप)
सातपाटी – करिष्मा उरतोल (शिवसेना)
माहीम – वैशाली करबट (शिवसेना)
केळवा – सीमा रावते (शिवसेना)
एडवण – सरीता सुतार (शिवसेना)
सफाळे – मनीषा निमकर (बवीआ)
डहाणू
सायवन -काशिनाथ चौधरी (शिवसेना)
गंजाड – अमिता घोडा (शिवसेना)
बोर्डी- ज्योती पाटील (भाजप)
धामणगाव – सतीश करबट (अपक्ष)
ओसरविरा – शैलेश करमोडा (राष्ट्रवादी)
कासा -जयश्री केणी (राष्ट्रवादी)
जामशेत – कली वळवी (भाजप)
वैनाड- जयवंत डोंगरकर (भाजप)
सरावली – सनील माच्छी (भाजप)
धाकटी डहाणू – जयेंद्र दुबळा (शिवसेना)
चिंचणी – देवानंद शिंगडे (काँग्रेस)
वणई – सुशील धुरी (शिवसेना)
विक्रमगड
तलवाडा- सुनीता कामडी (शिवसेना)
उटावली – संदेश ढोणे (राष्ट्रवादी)
दादडे – गणेश कासट (राष्ट्रवादी)
कुर्झे- ज्ञानेश्वर सांबरे (अपक्ष)
आलोंडे – नीलेश सांबरे (अपक्ष)
तलासरी
उपलाट – अनील झिरवा (माकप)
सूत्रकार – शेलू कुऱ्हाडा (भाजप)
डोंगरी -विजय उराडो (माकप)
झाई – रामू पागी (माकप)
उधवा- अक्षय दवणेकर (माकप)
जव्हार
वावर – मनीषा बुधर (माकप)
न्याहाळे- रेखा थेतले (भाजप)
कासटवाडी – गुलाब राऊत (शिवसेना)
कौलाळे – सुनीता धुम (राष्ट्रवादी)
मोखाडा
आसे- हबीब शेख (राष्ट्रवादी)
पोशेरा- राखी चोथे (भाजप)
खोडाळा – कुसुम झोले (भाजप)
वाडा
गारगाव – रोहिदास शेलार (राष्ट्रवादी)
मोज – अनुष्का (शिवसेना)
मांडा – अक्षता चौधरी (राष्ट्रवादी)
पालसई – शशिकांत पाटील (राष्ट्रवादी)
अबिटघर – नरेश आकरे (राष्ट्रवादी)
कुडूस – राजेश मुकणे (शिवसेना)
वसई
भाताणे – गणेश उंबरसाडा (शिवसेना)
चंद्रपाडा – कृष्णा माळी (अपक्ष)
अर्नाळा – आशा चव्हाण (भाजप)
कळंब- नीलिमा भोवर (बविआ)

































































