
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
एम.जे.अकबर यांच्यावर प्रिया रमाणी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यामुळे ते आधीच अडचणीत आले आहेत. या आरोपांमुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता अकबर यांच्यावर आणखी एका महिला पत्रकाराने आरोप लावला आहे. मात्र हा आरोप लैंगिक शोषणाचा नसून बलात्काराचा असल्याने तो जास्त गंभीर आहे. पल्लवी गोगोई ( Pallavi Gogoi ) असं या पत्रकाराचे नाव असून त्या सध्या नॅशनल पब्लिक रेडियोमध्ये मुख्य अर्थ संपादक म्हणून काम करीत आहेत. बलात्कार करण्यापूर्वी अकबर लैंगिक शोषणदेखील केलं होतं असं त्या म्हणाल्या आहेत.
Those before me have given me the courage to reach into the recesses of my mind and confront the monster that I escaped from decades ago. Together, our voices tell a different truth @TushitaPatel @SuparnaSharma @priyaramani @ghazalawahab
My story https://t.co/DG5dT7TEUU— Pallavi Gogoi (@pgogoi) November 1, 2018
गोगोई यांनी वॉशिंग्टन पोस्टला सविस्तर मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की या घटना २३ वर्षांपूर्वीच्या आहेत. तेव्हा त्या एशियन एजमध्ये काम करीत होत्या. त्यावेळी अकबर हे या वृत्तपत्राचे संपादक होते. पल्लवी यांनी वृत्तपत्राचं एक पान तयार केलं होतं आणि त्यातील मजकूर दाखवण्यासाठी त्या अकबर यांच्या केबिनमध्ये गेल्या होत्या.अकबर यांनी त्यांच्या कामाची तारीफ केली आणि त्यांचे चुंबन घेण्यासाठी अकबर त्यांना ओढायला लागले असं वॉशिंग्टन पोस्टने प्रसिद्ध केलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. यानंतर अकबर यांनी मुंबईतील एका हॉटेलच्या खोलीमध्ये पुन्हा गोगोई यांचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. अकबर यांना ढकलत त्यांनी कसाबसा खोलीतून पळ काढला. या घटनेनंतर अकबर यांनी गोगोई यांना नोकरीनवरून काढून टाकण्याचीही धमकी दिली होती.
गोगोई यांना बातमीच्या निमित्ताने जयपूरला पाठवण्यात आलं होतं. तिथे त्यांना अकबर यांनी काही निमित्ताने ते असलेल्या हॉटेलमध्ये बोलावलं होतं. रुममध्ये जाताच अकबर यांनी माझे कपडे फाडले आणि बलात्कार केला असं पल्लवी यांनी म्हटलंय. मी प्रतिकाराचा बराच प्रयत्न केला मात्र अकबर हे माझ्यापेक्षा जास्त ताकदवान असल्याने माझे प्रयत्न तोकडे पडले असं पल्लवी गोगोई यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर गोगोई यांनी नोकरी सोडून दिली होती. अकबर यांच्यावर किमान १२ महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. या महिलांमुळे मलाही हिम्मत मिळाली ज्यामुळे आज मी ही घटना लोकांना सांगू शकले असं पल्लवी यांनी एका ट्विटद्वारे म्हटले आहे.
























































