तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान

613
election

अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 8 डिसेंबर 2019 रोजी मतदान होणार आहे. तर 9 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी दिली.

मदान यांनी सांगितले की, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यांची छाननी 25 नोव्हेंबरला होणार आहे. छाननीनंतर त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे 28 नोव्हेंबरपर्यंत अपील करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबररोजी; तर अपील असलेल्या ठिकाणी 4 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 8 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

 

आपली प्रतिक्रिया द्या