
प्राइम व्हिडिओची फेमस वेब सिरीज ‘पंचायत’ फेम अभिनेता आसिफ खानला सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. सध्या अभिनेत्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आसिफ खानने पंचायत सिरीजमध्ये जावयाची भूमिका निभावली आहे. आसिफ खानने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत तब्येतीबाबत चाहत्यांना माहिती दिली.
आसिफने इंस्टाग्राम स्टोरीवर रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे. फोटो सीलिंगचा आहे. फोटो शेअर करत पुढे लिहिले की, “36 तास हे पाहिल्यानंतर मला जाणवले की आयुष्य खूप छोटं आहे. एकही दिवस गृहीत धरू नका. एका क्षणात सर्व काही बदलू शकते. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा. तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे काय आहे हे जाणून घ्या आणि ते लक्षात ठेवा. जीवन ही अनमोल भेट आहे आणि आपण धन्य आहोत.”
यानंतर त्याने दुसरी पोस्ट केली आहे. यात त्याने ज्या दिवशी तो रुग्णालयात दाखल झाला त्या दिवसाबाबत सांगितले. तो म्हणाला, मला काही तासांपासून त्रास होत होता. त्यामुळे मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. आता माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तसेच आपल्याप्रती व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.