पंढरपुरात कोरोनाचा शिरकाव, एकाच दिवशी 5 रुग्ण आढळले

757

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना पासून दूर असलेल्या पंढरपूर शहरात आज कोरोनाचा शिरकाव झाला असून शहरात 2 आणि तालुक्यात 3 असे एकूण आज 5 रुग्ण आढळून आले. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 6 वर पोहचला आहे.

पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे पूर्वीचा 1 आणि आजच्या तपासणीत 1 जण आढळून आल्याने उपरीतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 वर पोहचली. करकंब गावात 1, गोपाळपूर मध्ये 1 आणि पंढरपूर शहरात 2 असे एकुण 6 रुग्ण संख्या झाली आहे. सदर रुग्ण हे मुंबई आणि पुण्याहून आलेले असून त्यांना इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे त्या परिसरातील आणि कुटुंबातील लोकांना या रुग्णांचा धोका नाही.

फुकट जमिनी लाटणाऱ्या रुग्णालयांत मोफत उपचार करा! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश

आजवर एकूण 51 संशयित रुग्णांचे घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. यामध्ये बुधवारी 45 रुग्णांचे कोरोना अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तर 5 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले. यापूर्वी उपरीचा 1 जण पॉझिटिव्ह आहे. यामधील 4 रुग्ण हे मुंबई येथून पंढरपुरात आले होते. तर 1 रूग्ण पुणे येथून परतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या