मुख्यमंत्र्यांसह ३ मंत्री गंभीर आजाराने त्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र वालावलकर, पणजी

गोव्यामध्ये काँग्रेसला बाजूला सारत जोडतोड करीत स्थापन करण्यात आलेल्या सरकारला कोणाची नजर लागलीय असा प्रश्न गोवेकरांना पडला आहे. १२ जणांच्या मंत्रिमंडळातील ३ प्रमुख मंत्री हे गंभीर आजाराने त्रस्त आहेत. गोव्याचे उर्जामंत्री पांडुरंग मडकईकर यांना ब्रेनस्ट्रोक आला असून त्यांना मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना कर्करोग झाला असून ते सध्या अमेरिकेमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये तीन वरिष्ठ मंत्र्यांची समिती गोव्याचा कारभार बघते आहे. पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातील नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना मूत्रपिंडाचा आजार असून ते डायलिसिसवर आहेत. पर्रीकर आणि डिसोझा यांच्यापाठोपाठ मडकईकर यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याने गोव्याच्या कारभाऱ्यांच्या प्रकृतीबाबत गोवेकर चिंतीत झाले आहेत.