गोव्यात 108 इंच पाऊस

335

सामना ऑनलाईन। पणजी

गोव्यात यंदाच्या मोसमात आतापर्यंत 108 इंच पाऊस झालेला आहे. वाळपईत जवळपास 140 इंच तर सांखळीत 121 इंच पाऊस झालेला आहे. सांगेमध्ये 122 इंच पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे.

आगामी दोन दिवसात पुन्हा जोरदार पाऊस पडेल, असा इशारा पणजी वेधशाळेने दिला आहे. मडगाव मध्ये सकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे फातोर्डा स्टेडियम परिसरतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पहायला मिळाले.

गेल्या 24 तासात राज्यात केवळ 9.6 मि. मी. एवढीच पावसाची नोंद झाली. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.

आगामी 48 तासात राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गेल्या 24 तासात सर्वत्रच अत्यल्प पाऊस झाला. काणकोण, मुरगाव व सांगे भागात पाऊण इंच, पेडणे, पणजी, सांखळी, दाबोळी, केपे आदी भागात अर्धा इंच पेक्षा कमी पाऊस झाला.

पणजीत एकूण 102 इंच पाऊस झाला.

आगामी 48 तासात सर्वत्र जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्र अद्याप खवळलेला आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला.

गेल्या 24 तासात पडलेल्या 9.6 मि. मी. पावसामुळे राज्यात आतापर्यंत पडलेला पाऊस 2590.7 मि. मी. म्हणजेच 102 इंच एवढी नोंद झाली असून ती पणजीत नोंदविलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या