कोणाचीही हानी होणार नाही असा भूकंप करण्याचा प्रयत्न करेन – पंकजा मुंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोपीनाथ गडावर उद्या 12 डिसेंबरला होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. फेसबुकवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टचे अनेक अर्थ काढण्यात आले, मात्र पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत याबाबत स्पष्टीकरण दिले. आता या मेळाव्यापूर्वी बोलताना पंकजा मुंडे यांनी कोणाचीही हानी होणार नाही असा भूकंप करण्याचा प्रयत्न करेन, असे विधान केल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

पंकजा मुंडे यांना ‘टीव्ही-9’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा उल्लेख केला. पंकजा मुंडे यांना उद्या राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या की, ‘तुम्ही एवढ्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत. आता काय करणार? पण भूकंप काही चांगली गोष्ट नाही. कुणाचीही हानी होणार नाही असा भूकंप करण्याचा प्रयत्न करेन.’

फडणवीसांची घरी येऊन चर्चा
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या घरी येऊन चर्चा केली. पंरतु माझ्याकडून कधीही माध्यमांना बातम्या पुरवल्या नाहीत. आमची भेट उशिरा झाल्याने माध्यमांना याविषयी माहिती मिळाली नसावी आणि मीही कुणाला या व्यक्तिगत भेटीबद्दल सांगत नाही.

उद्या काय बोलणार?
मी वैयक्तिक कोणावरही नाराज नाही. पण मी कार्यपद्धतींवरील दोषांवर बोलते. माझी वाढ तशीच झाली आहे. पाच वर्षात खूप गोष्टी बदलल्या आहेत. त्याविषयी मी कार्यकर्त्यांशी बोलेन, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.