सभा संपल्यानंतर पंकजा मुंडे यांना आली चक्कर

38819

भाजपाच्या स्टार प्रचारक परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाच सभा घेतल्या. परळी शहरातील शेवटची सभा संपल्यानंतर त्यांना व्यासपीठावरच चक्कर आली. पंकजा मुंडे यांनी कन्हेरवाडी, जिंतूर, पाटोदा, वडवणी आणि परळी शहर या पाच ठिकाणी सभा घेतल्या. परळी शहरातील सभेचे भाषण झाल्यानंतर त्यांना व्यासपीठावरच चक्कर आली. पंधरा दिवसांपासूनचे दौरे, जागरण, दगदग आणि धावपळ यामुळे त्या काहीशा अस्वस्थ होत्या. चक्कर आल्यानंतर शहरातील परळी टॉवरजवळ रूग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या