भविष्यात राष्ट्रवादी दोन व्यक्तींचाच पक्ष राहणार, पंकजा मुंडेंची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्ञानेश्वर लंगे, वडवणी

राष्ट्रवादी पक्षाला निश्चितच घरघर लागली आहे. भविष्यात तर राष्ट्रवादीमध्ये केवळ दोघेच दिसतील, लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही. प्रत्येक जण फक्त तोंडाकडे बघत आहेत, अशी अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे, या शब्दात पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.

वडवणी येथील बाजारसमितीच्या विविध विकास कामाचे लोकार्पण नगरपंचायतच्या वतीने शहरात व्यापारी संकुल, अद्यावत स्मशानभूमी, पुल, सिमेंट रोड, अंडरग्राउंडड्रेनेज इत्यादी विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याणमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे, आमदार आर.टी.देशमुख, आमदार सुरेस धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार संगीता ठोंबरे, आमदार भीमराव धोंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी उसाच्या मुद्द्यावर शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभी आहे. वडवणीच्या विकासासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी आपण दिला आहे. जन्मापासून मरेपर्यंत तुमची काळजी मी घेणार आहे, असेही त्या म्हणाल्या. या वेळी जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, रमेश पोकळे, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, केशव आंधळे, रमेश आडसकर, मोहन जगताप, दिनकरराव आंधळे, अनिता राजाभाऊ मुंडे, ऍड प्रदीप शेळके, राम सावंत, मच्छिंद्र झाटे अदी मान्यवरांची उपस्थिती होती.