
पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त भारत राठोड यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवत राठोड यांनी तब्बल आठ वर्षे आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केल्याने एकच खळबळ उडाली. भारत राठोड हे पनवेल महापालिकेत अतिरिक्त आयुक्त क्रमांक 2 असून पीडितेची ओळख झाल्यानंतर वारंवार अत्याचार करण्यात आला. त्यातून ही महिला तीन वेळा गर्भवती राहिली. उच्चपदस्थ अधिकारी असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने आपणास धमकावल्याचा आरोपदेखील करण्यात आला.