
परभणीत या वर्षीच्या उन्हाळ्यात तापमानाने रविवारी 44.1 अंश सेल्सियस एवढा मोठा पल्ला गाठला. परिणामी शहरासह परिसरात उसळलेल्या उष्णतेच्या लाटेने परभणीकर अक्षरक्षः हैराण झाले.
या उन्हाळ्यात मे महिन्याच्या मध्यंतरापर्यंत सुध्दा सर्वसामान्य नागरिकांना यावर्षी तीव्र उन्हाळा जाणवला नाही. यावर्षीचा उन्हाळा तीव्र असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी उन्हाळा कठीण जाणार असे गृहीत धरले होते. परंतू मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात तापमान फारसे वाढले नाही. 20 मे नंतर तापमान हळूहळू वाढू लागले. 40 अंशापासून तापमाने 42 अंशापर्यंत पल्ला गाठला. 20 मे रोजी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले. दुपारीच्या आत हवेत कमालीची उष्णता जाणवली. दुपारी अड़ीच ते तीनच्या सुमारास तापमान कमालीचे वाढले. ते 44 अंश सेल्यीसंस पर्यंत पोहचले होते.



























































