परळीतील ‘ती’ हत्या प्रेमप्रकरणातून, आरोपींनी गुन्हा केला कबुल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळी शहरात आज सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याच्या घटनेने हादरले होते. या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत यामध्ये दोन्ही आरोपींनी गुन्हा कबुल केल्याचे सांगितले आहे.

गणेशपार भागातील अनिल हालगे (वय-22) या युवकाचा मृतदेह सकाळी पोलीस ठाण्यापासून बाजूला असलेल्या कब्रस्तानमध्ये आढळून आला. या युवकाच्या शरीरावर हत्याराने मारल्याच्या खूना दिसुन आल्याने ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हत्येत वापरलेले दगड, ब्लेड व तुकडे केलेला मयताचा मोबाईल पोलिसांना दिल.

दरम्यान, ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. या घटनेतील दोन आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.