परळीत ट्रॅफिक व्यवस्थेचे वाजले तीन-तेरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळी शहरात असलेले शहर पोलीस ठाणे, संभाजीनगर पोलीस ठाणे असतांनाही कायदा सुव्यवस्थेवर पोलिसांचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. शहरातल्या ट्रॅफिक व्यवस्थेवरही कुठलेच नियंत्रण नसल्याचे गुरुवारी पहायला भेटले. भरदिवसा परळीच्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर एका मोटारसायकल स्वाराला कारने उडवले. त्याला मदत करण्यासाठी गेलेल्या अनेकांना त्याच कारवाल्याने अनेकांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. उड्डाणपुलावर असलेल्या पोलीस चौकीच्या समोर ही घटना घडली.

उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असूनही तिथे असलेल्या पोलीस चौकीत बहुतेक वेळा कर्मचारी नसतातच. या ठिकाणी ट्रॅफिक जाम किंवा घटना झाल्यास पोलिसांना समजल्यावर पोचतात. मात्र उड्डाण पुलावर अशी घटना होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी उड्डाण पुलावर असलेल्या चौकती कधीच पोलिसांचा वावर दिसत नाही.

ही बाब अत्यंत गंभीर असून याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच परळी परिसरात रात्री बेरात्री घडणाऱ्या रस्ते अपघाताच्या घटना वाढल्या असून या सर्वांना अवैध वाहतूक जवाबदार असल्याचे दिसते आहे. या अवैध वाहतुकीकडेही पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.