
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चौकशी आयोगापुढे पुन्हा एकदा गैरहजर राहिले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणाऱया न्या. चांदिवाल आयोगाने आता 7 सप्टेंबरला पुढील सुनावणी ठेवली आहे. या तारखेस गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट काढले जाईल, असा इशारा न्या. चांदिवाल यांनी दिला आहे.
राज्याच्या गृहमंत्र्यांकर शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप करून परमबीर सिंह यांनी खळबळ उडकून दिली होती. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांची एकसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. मात्र परमबीर यांनी सातत्याने या प्रकरणाची चौकशी करणाऱया न्या. चांदिवाल आयोगापुढे साक्ष देण्यास येणे टाळले. आतापर्यंत पाच केळा समन्स बजावूनही ते आयोगापुढे हजर झाले नाहीत. या प्रकरणात अखेरची संधी म्हणून 7 सप्टेंबरला आयोगापुढे हजर राहून जबाब नोंदवण्याचे निर्देश परमबीर सिंह यांना देण्यात आले आहेत. अन्यथा त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात येणार आहे.
यापूर्वी दोन वेळा 25 हजारांचा दंड
न्या. चांदिवाल आयोगाने निर्देश देऊनही परमबीर सिंह यांनी अद्याप आयोगापुढे येऊन प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. यामुळे आयोगाने आतापर्यंत दोन वेळा त्यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच दंडाची ही रक्कम मुख्यमंत्री कोविड मदत निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जून महिन्यातही आयोगाने परमबीर यांना 5 हजारांचा दंड ठोठावला होता.


























































