परभणीतील तिघे पॉझिटिव्ह, कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या शंभरी पार

603

परभणी शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील इक्बालनगर, गव्हाणे चौक भागातील एकजण व प्रभाग क्रमांक ७ मधील अपना कॉनर परिसरातील २ व्यक्ती कोरोंनाबाधीत आढळल्या आहे. त्यामुळे कोरोंनाबाधीत रूग्णांच्या संख्या आता १०१ झाली आहे. दरम्यात सायंकाळच्या या अहवालानंतर आणखी 3 रूग्ण कोरोनाबाधीत आढळल्या आहेत.

परभणीत शहरातील अपना कॉर्नर भागातील पस्तीस वर्षाची महिला, गव्हाणे चौक भागातील एकजण तसेच एकबाल नगरातील साठ वर्षीय पुरुषाला अशा एकूण ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल आज सायंकाळी उशिरा प्राप्त झाला. महिला रुग्णाच्या संपर्कात ५ जण तर साठ वर्षे पुरुष रुग्णाच्या संपर्कात दोघेजण आल्याची माहिती असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ६१३ संशयितांची नोंद झाली आहे. यापैकी २ हजार ८१२ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यातील २ हजार ५८७ नमुने निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली असून यातील तीन जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे तर ९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने बाधित ३ रुग्णांवर उपचार सुरू असून ते राहत असलेला परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केल्यानंतर जिल्हा महसुल प्रशासनाने आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून शनिवार, २७ जूनच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. महानगरपालिका हद्द व ५ कि.मी. अंतराच्या परिसरात ही संचारबंदी लागू असेल, असे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जाहीर केले आहे. या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवांनाच मुभा राहील. तसेच दुध विक्रेत्यांना काही काळाकरिता तसेच कृषी विषयक दुकानांनाही सुट राहिल. परंतु राष्ट्रीय बँकांनी रेशन दुकानदारांचा पैसा भरण्या करण्या पुरतेच कामकाज करावे, असे आदेश जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या