परभणी – आगीत चार घरे जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील औद्योगिक वसाहत परिसर जवळ असलेल्या अहिल्यादेवी होळकर नगरमध्ये शॉर्टसक्रीटने लागलेल्या आगीत चार घर भस्मसात झाल्याची घटना सोमवारी दुपारी 12.30 ते १ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेत कोणतीही जिवित हाणी झाली नाही.

परिसरातील अहिल्यादेवी होळकर नगरमधील एका घरात सोमवारी अचानक आग लागली. हे घर लाकडी पार्टीशनचे असल्याने घरातील साहित्य तातडीने जळाले. ही आग आटोक्यात आनेपर्यंत बाजूलाच असलेल्या दुसऱ्या घराने ही पेट घेतला. पाहता पाहता एकमेकांना लागून असलेल्या चार घरांनी पेट घेतला. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत चारही घरे जळून खाक झाली होती. या आगीत कोणतीही जिवित हाणी झालेली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.