परभणी – मशीन अपघात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर शिवारामध्ये आज शुक्रवार, 27 नोव्हेंबर दुपारी २ वाजेच्या सुमारास बळीराजा साखर कारखान्याच्या गाळपासाठी ऊस घेऊन जाणाऱ्या ऊस मशीनचा विद्युत वितरण कंपनीच्या तारेचा स्पर्श झाल्यामुळे मशीन चालकाचा मृत्यू झाला. तर त्याला मदत करणारा ट्रक मालक तोही विजेच्या धक्क्याने जागीच गतप्राण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सध्या पूर्णा तालुक्यामध्ये साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सुरू झाला आहे. या गळीत हंगामासाठी ऊस तोडण्यासाठी गाव पातळीवर काम करणारे कामगार व ऊस तोडणी मशीनदार गोदाकाठी आले आहेत. तालुक्यातील कंठेश्वर येथे आज एका शेतकNयाच्या शेतामध्ये ऊस तोडण्याची प्रक्रिया सुरू असताना साखर कारखान्याची मशीन ऊस तोडत असताना मशीनचा वरचा भागा विद्युत वितरण कंपनीच्या तारेला चिकटला पडल्यामुळे मशीन चालक सारंगी येथील अमोल उद्धव जोगदंड (25) हा जोराचा धक्का लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला तर त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणारा बाजूला उभा असलेला ट्रक मालक किसन पंढरीनाथ कराळे (30) हाही मदतीला धावला धावला असता त्याला विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.