
परळ येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटल आणि फिनिक्स पॅलेडियम यांच्या संयुक्त विद्यमाने मॉल परिसरात नागरिकांमध्ये स्ट्रोकबाबत जनजागृती करण्यात आली. स्ट्रोक कसा येऊ शकतो, स्ट्रोकची लक्षणे कशी ओळखावी याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. चेहरा एका बाजूस झुकणे, हात-पाय लुळे पडणे, बोलताना अडखळणे, दृष्टीसंबंधी समस्या उद्भवणे अशी स्ट्रोकची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकिय मदत घेण्याचा सल्ला यावेळी उपस्थितांना देण्यात आला.




























































