
बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी आपल्या आपल्या मुलाचे नामकरण केले असून त्याचे नाव नीर ठेवले आहे, अशी माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. या जोडप्याला 19 ऑक्टोबरला पुत्रप्राप्तीचा लाभ झाला होता. ठीक एक महिन्याच्या नंतर परिणिती-राघव यांनी मुलाचा फोटो शेअर करत नावाची घोषणा केली आहे. पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटले की, जलस्य रूपम, प्रेमस्य स्वरूपम, तत्र एव नीर. आम्ही आमच्या मुलाचे नाव नीर ठेवले आहे, असे म्हटले आहे.



























































