परिणिती चोप्राने दिली गूड न्यूज

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आपचे नेते राघव चड्ढा आईबाबा होणार आहेत. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी दिली. परिणिती-राघवने केकचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर ‘1+1=3’ असा गोड संदेश लिहिला असून लहान बाळाच्या पावलांचे चित्रही आहे. परिणितीने पोस्ट शेअर करताना लिहिलंय, ‘आमचे चिमुकले विश्व… लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. आम्ही खूपच भाग्यवान आहोत.’ परिणिती-राघववर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.