
क्रीडाविश्वातील सर्वेच्च क्रीडा महोत्सव अर्थात पॅरिस ऑलिम्पिकचा थरार सुरू होण्यास जेमतेम सहा दिवसांचा अवधी उरलाय. हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंचे पथक या क्रीडा महोत्सवात कौशल्य पणाला लावण्यासाठी सज्ज झाले आहे. मात्र, या 117 खेळाडूंच्या चमूत पुन्हा एकदा हरणायाचे वर्चस्व बघायला मिळाले असून, या राज्यातील सर्वाधिक 24 खेळाडूंनी ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले आहे. त्याखालोखाल पंजाब व तामीळनाडू या राज्यांतील खेळाडूंचा दुहेरी आकडा आहे. महाराष्ट्राच्या फक्त पाच खेळाडूंना पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळविता आले आहे.
येत्या 26 जुलैपासून सुरू होणाऱया या ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थान किती पदकांची कमाई करतो? याकडे हिंदुस्थानातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासामध्ये हिंदुस्थानने आत्तापर्यंत एकूण 35 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्यपदकांचा समावेश आहे. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने सर्वाधिक यश प्राप्त केले. या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण सात पदके जिंकली. मात्र, यंदा हा पदकांचा दुष्काळ संपविण्यासाठी हिंदुस्थानचे शिलेदार सज्ज झाले आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडू पदकांचा दुहेरी आकडा गाठतील का? याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
कोणत्या राज्याचे किती खेळाडू?
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हिंदुस्थानातील 117 खेळाडू सहभागी होत आहेत. यांमध्ये सर्वाधिक खेळाडू हरयाणा राज्यातील आहेत. हरयाणा 24, पंजाब 19, तामीळनाडू 13, कर्नाटक 7, उत्तर प्रदेश 7, केरळ 6, महाराष्ट्र 5, उत्तराखंड 4, दिल्ली 4, आंध्र प्रदेश 4, तेलंगणा 4, पश्चिम बंगाल 3, चंदीगड 2, गुजरात 2, ओडिशा 2, राजस्थान 2, मणिपूर 2, मध्य प्रदेश 2, आसाम 1, बिहार 1, गोवा 1, झारखंड 1, सिक्कीम 1 असा खेळाडूंचा समावेश आहे.
कोण कोण असतील खेळाडू?
महाराष्ट्र ः प्रवीण जाधव (तिरंदाजी), अविनाश साबळे (अॅथलेटिक्स), सर्वेश कुशारे (अॅथलेटिक्स), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), स्वप्नील कुसळे (शूटिंग).
हरयाणा ः भजन कौर (तिरंदाजी), किरण पहल (अॅथलेटिक्स), नीरज चोप्रा (अॅथलेटिक्स), अमित पंघाल (बॉक्सिंग), जास्मिन लेम्बोरिया (बॉक्सिंग), निशांत देव (बॉक्सिंग), प्रीती पवार (बॉक्सिंग), दीक्षा डागर (गोल्फ), संजय (हॉकी), सुमित (हॉकी), बलराज पंवार (रोइंग), अनिश भानवाला (शूटिंग), मनू भाकर (शूटिंग), रमिता जिंदाल (शूटिंग), रायजा ढिल्लों (शूटिंग), रिदम सांगवान (शूटिंग), सरबज्योत सिंग (शूटिंग), सुमित नागल (टेनिस), अमन सहरावत (कुस्ती), अंशू मलिक (कुस्ती), अंतिम पंघाल (कुस्ती), निशा दहिया (कुस्ती), हृतिका रेड्डी (कुस्ती), विनेश फोगाट (कुस्ती).
आंध्र प्रदेश ः धीरज बोम्मादेवरा (तिरंदाजी), ज्योती याराजी (अॅथलेटिक्स), ज्योतिका श्रीदांडी (अॅथलेटिक्स), सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन).आसाम ः लोव्हलिना बोर्गेहेन (बॉक्सिंग).
बिहार ः श्रेयसी सिंग (शूटिंग).
चंदीगड ः अर्जुन बबुता (नेमबाजी), विजयवीर सिद्धू (शूटिंग).
दिल्ली ः अमोज जेकब (अॅथलेटिक्स), तौलिका कॉप्रा (ज्युडो), राजेश्वरी कुमारी (नेमबाजी), मणिका बत्रा (टेबल टेनिस).
गोवा ः तानिषा क्रास्टो (बॅडमिंटन).
गुजरात ः हरमित देसाई (टेबल टेनिस), मानव ठक्कर (टेबल टेनिस).
झारखंड ः दीपिकाकुमारी (धनुर्विद्या).
कर्नाटक ः पूवम्मा एम.आर. (अॅथलेटिक्स), अश्विनी पोनप्पा (बॅडमिंटन), अदिती अशोक (गोल्फ), श्रीहरि नटराज (जलतरण), धिनिधी देशसिंघू (जलतरण), अर्चना कामत (टेबल टेनिस), रोहन बोपण्णा (टेनिस).
केरळ ः अब्दुल्ला अबुबकर (अॅथलेटिक्स), मोहम्मद अजमल (अॅथलेटिक्स), मोहम्मद अनस (अॅथलेटिक्स), मिझो चाको कुरियन (अॅथलेटिक्स), पीआर श्रीजेश (हॉकी), एचएस प्रणय (बॅडमिंटन).
मध्य प्रदेश ः विवेक सागर प्रसाद (हॉकी), ऐश्वर्या प्रतापसिंह तोमर (नेमबाजी).
मणिपूर ः मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), नीलकांत शर्मा (हॉकी). ओडिशा ः अमित रोहिदास (हॉकी), किशोर जेन्ना (अॅथलेटिक्स).
पंजाब ः अक्षदीप सिंग (अॅथलेटिक्स), तजिंदरपालसिंग तूर (अॅथलेटिक्स), विकास सिंग (अॅथलेटिक्स), गगनजीत भुल्लर (गोल्फ), गुरजंत सिंग (हॉकी), हार्दिक सिंग (हॉकी), हरमनप्रीत सिंग (हॉकी), जर्मनप्रीत सिंग (हॉकी), जुगराज सिंग (हॉकी), कृष्ण बहादूर पाठक (हॉकी), मनदीप सिंग (हॉकी), मनप्रीत सिंग (हॉकी), समशेर सिंग (हॉकी), सुखजित सिंग (हॉकी), अंजुम मुदगिल (शूटिंग), अर्जुन चिमा (नेमबाजी), सिफ्ट काwर समरा (नेमबाजी), संदीप सिंग (नेमबाजी), प्राची चौधरी कालियार (अॅथलेटिक्स).
राजस्थान ः अनंतजितसिंग नारुका (नेमबाजी), माहेश्वरी चौहान (नेमबाजी).
सिक्कीम ः तरुणदीप राय (तिरंदाजी).
तामीळनाडू ः जेसविन आल्ड्रिन (अॅथलेटिक्स), प्रवीण चित्रवेल (अॅथलेटिक्स), राजेश रमेश (अॅथलेटिक्स), संतोष तमिलरासन (अॅथलेटिक्स), सुभा वेंकटेशन (अॅथलेटिक्स), विथ्या रामराज (अॅथलेटिक्स), नेत्रा कुमनन, विष्णू सर्वणन, एलावेनिल वलारिवन (शूटिंग), पृथ्वीराज तोंडैमन (नेमबाजी), साथियान ज्ञानसेकरन (टेबल टेनिस), शरथ कमल (टेबल टेनिस), एन. श्रीराम बालाजी (टेनिस).
तेलंगणा ः पी.व्ही. सिंधू (बॅडमिंटन), निखत झरीन (बॉक्सिंग), ईशा सिंह (नेमबाजी), श्रीजा अकुला (टेबल टेनिस). उत्तराखंड ः अंकिता ध्यानी (अॅथलेटिक्स), परमजीत बिश्त (अॅथलेटिक्स), सूरज पनवार (अॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन).
उत्तर प्रदेश ः अन्नू राणी (अॅथलेटिक्स), पारुल चौधरी (अॅथलेटिक्स), प्रियांका गोस्वामी (अॅथलेटिक्स), राम बाबू (अॅथलेटिक्स), शुभंकर शर्मा (गोल्फ), ललितकुमार उपाध्याय (हॉकी), राजकुमार पाल (हॉकी). पश्चिम बंगाल ः अंकिता भक्त (तिरंदाजी), अनुष अग्रवाल (इक्वेस्ट्रियन ड्रेसेज इव्हेंट), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस).