लक्षवेधी समारोप सोहळा!

33व्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 हजारांहून अधिक खेळाडूंनी 32 क्रीडा प्रकार एकूण 329 पदकांसाठी कौशल्य पणाला लावलं. पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप सोहळा फ्रान्समधील स्टेड डी फ्रान्स या सर्वात मोठ्या स्टेडियमवर झाला. या सोहळ्यासाठी स्टेडियमचे थिएटरमध्ये रूपांतर करण्यात आलं होतं. या सोहळ्यात अनेक कलाकारांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता टॉम क्रूझदेखील उपस्थित होता.

या सोहळ्यातील परेडमध्ये सर्व खेळाडू आपापल्या देशांचे झेंडे घेऊन दिसले. हिंदुस्थानकडून हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि नेमबाज मनू भाकर एकत्रितपणे ध्वजवाहक म्हणून दिसले. समारोप समारंभात स्टेडियममध्ये लेझर शो झाला. या लेझर शोने अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं.