महाबली पारकर

678

>>नितीन फणसे

महाबली हनुमानाने फळ समजून सूर्यावर झेप घेतली, पण आग ओकणाऱ्या सूर्याची त्याला फारशी माहिती नव्हती म्हणून सूर्य पकडण्यात तो अपयशी ठरला. पण आता आगीच्या याच गोळ्याचा पृष्ठभाग एवढा गरम का, याची संपूर्ण माहिती घेऊन नासाचे ‘पारकर सोलार प्रोब’ यान सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतंय. यातूनच काही धक्कादायक बाबी नुकत्याच जगासमोर आल्या आहेत.

धुळीचा लवलेश नाही
‘पारकर’ या अंतराळ यानाने पाठवलेल्या काही छायाचित्रांतून सूर्याच्या अवतीभवती असलेली धूळ आणि कचऱ्याचे अवलोकन करता येतंय. हा अंतराळ कचरा सूर्याजवळून गेलेल्या धूमकेतू किंवा भल्या मोठय़ा अशनींमुळे झाला असावा याचाही अंदाज येतो. सूर्याच्या अगदी जवळ मात्र कुठल्याही प्रकारच्या अंतराळ कचऱयाचा लवलेशही दिसत नाही. त्यामुळे तसं पाहिलं तर सूर्याजवळ धूळविरहित झोन आहे असंही म्हणता येईल. युरोपियन अंतराळ संस्थेनेही सूर्यमोहिमेची आखणी केली असून त्यांचे सोलार ऑर्बिटर हे यान येत्या फेब्रुवारीत सूर्याकडे झेपावणार आहे. हे यान ‘पारकर’ यानाप्रमाणे सूर्याच्या जवळ जाण्याचा मुळीच प्रयत्न करणार नसून दूर राहूनच सूर्याच्या ज्वाळांचा, सौर काऱ्यांचा अभ्यास करणार आहे.

गेल्या वर्षी लाँच झाल्यापासून ‘पारकर सन प्रोब’ या यानाने सूर्याला तीन प्रदक्षिणा मारल्या आहेत. एवढय़ा कमी वेळेत सूर्याभोवती फेऱ्या मारणारे हे पहिलेच मनुष्यनिर्मित अंतराळ यान ठरले आहे. काहीच दिवसांपूर्वी या यानाने आपले निष्कर्ष पाठवायला सुरुवात केली आहे. यातून आतापर्यंत माहीत नसलेली सूर्याची अनेक रहस्ये उघड झाली आहेत. आणखीही काही रहस्ये लवकरच उलगडतील.

‘पारकर’ या सन प्रोब मोहिमेचा प्रारंभ ऑगस्ट 2018 मध्ये झाला. त्यावेळी या मोहिमेसाठी अमेरिकन सरकारने दीड अब्ज डॉलर्स मंजूर केले आहेत. हा अफाट खर्च होणार असला तरी या मोहिमेतून सूर्याबद्दलची अज्ञात माहिती जगासमोर येणार आहे. लाँच झाल्यापासून आतापर्यंत या यानाने घातलेल्या फेऱ्या सूर्यापासून केवळ दीड कोटी मैल अंतराकरून (जवळपास 2 कोटी 40 लाख किलोमीटर्स) मारल्या आहेत हे येथे लक्षात घ्यावेच लागेल. कारण सूर्याच्या इतक्या जवळ जाणारे ‘पारकर’ हे पहिलेच अंतराळ यान म्हटलं जातंय ते यामुळेच… हे अंतर सूर्याच्या पृष्ठभागापासून बुध ग्रहापर्यंतच्या अंतराच्या अर्धे अंतर आहे. यापूर्की अमेरिका आणि पश्चिम जर्मनीची संयुक्त मोहीम असलेले ‘हेलियस-2’ हे यान सूर्याच्या 2 कोटी 65 लाख मैलांपर्यंत (जवळपास 4 कोटी 27 लाख किलोमीटर्स) गेले होते. ‘पारकर’ या नासाच्या यानाने केलेल्या कामगिरीची चार पानी माहिती ‘नेचर’ या जर्नलमध्ये देण्यात आली आहे.

यानाने आपल्या तीनपैकी पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये आढळलेले निष्कर्षपृथ्वीवर पाठवले आहेत. ही माहिती पूर्णपणे नवीन असून जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे काम नेमके कसे चालते, त्याच्या अस्तित्वामुळे पृथ्वीवर वाताकरण कसे निर्माण झाले आणि ते त्याच्यामुळेच अबाधित कसे राहिले आहे याची माहिती आता आम्ही मिळवणार आहोत, असे नासाच्या हेलिओफिजिक्स विभागाचे संचालक निकोला फॉक्स म्हणाले. सूर्याच्या गरमीचे रहस्य कळले, तर त्यापासून उपग्रहांना, अंतराळवीरांना उद्भवणारा धोका संशोधकांना टाळता येणार आहे. ‘पारकर’ यान अजून सहा वर्षे कार्यरत राहणार असून त्याद्वारे सूर्याबद्दलची आणखीही काही रहस्ये उघड होण्याची शक्यता आहेच.parker-2

मुळात सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियमचा मोठा गोळा असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. तरीही हा गोळा आणि त्यावरील वातावरण एवढे तप्त कसे, हा प्रश्न संशोधकांना बरीच वर्षे सतावत आहे. त्याचेही उत्तर या ‘पारकर सन प्रोब’द्वारे मिळण्याची आशा आता काढली आहे. पृथ्वीवरून आपल्याला दिसतो त्या सूर्याच्या पृष्ठभागाकर 10 हजार अंश फेरनहीट तापमान आहे. पण या पृष्ठभागावरील वातावरण म्हणजेच ज्याला कोरोना म्हटलं जातं, ते त्यापेक्षाही जास्त म्हणजे तब्बल 300 पटींनी जास्त गरम आहे. या कोरोनामध्येच आगीच्या ज्वाळा आहेत. त्यातूनच ठिणग्या उडत असून त्या ब्रह्मांडात पसरत आहेत. सूर्याच्या वातावरणातील ज्वाळांमुळे सूर्याच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात कंपने निर्माण होत आहेत. ही कंपने एखाद्या गिटारच्या तारांप्रमाणे कंपित होत असल्याचे प्रा. जस्टीन सी. कॅस्पर यांनी सांगितले. हे प्रा. कॅस्पर मिशिगन विद्यापीठात अंतराळ विज्ञान आणि अभियांत्रिकीचे प्राध्यापक असून नासाच्या सूर्यमोहिमेतही त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. कोरोनामधील कंपनामुळे या ज्वाळांमध्ये तरंग निर्माण होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

हे तरंग उठल्यामुळे आगीच्या ज्वाळाही तीव्रतेने लांबवर जातात. या ज्वाळांचा वेग अवघ्या काही सेकंदांत ताशी 4 लाख 80 हजार किलोमीटरपर्यंत जाऊ शकतात. ज्यावेगाने या ज्वाळा फेकल्या जातात, त्याच वेगात त्या परत जातात. त्यामुळेच पृथ्वीसह सर्वच ग्रह शाबूत आहेत. या ज्वाळा येतात आणि जातात हा नयनरम्य सोहळा अगदी पहात राहण्यासारखा असतो, असंही प्रा. कॅस्पर यांनी यावेळी स्पष्ट केलं. संशोधकांनी या इंग्रजी ‘एस’ अक्षरासारख्या आकाराला ‘स्कीचबॅक’ असं संबोधलं आहे. म्हणजे सूर्य आपल्याच वातावरणातील एनर्जऑडहड बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील भौतिक शास्त्रज्ञ स्टुअर्ट बेल यांनी ‘पारकर’ मोहिमेत सौर वायूच्या विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचे मोजमाप केले आहे. यावेळी त्यांना पृथ्वीवरून निघालेल्या जलाशयाचा भास झाला. जर हे खरोखरच पाणी असेल तर सौर काऱयांमध्ये हे पाणी कसे, हे जरा विचित्रच वाटत नाही का, असा त्यांना प्रश्न पडला आहे. हे सौर वारे पृथ्वीपर्यंत येतात तेव्हा त्यांची सरमिसळ होते. त्यामुळे ते समजणे कठीण होते. त्यामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर नेमकं काय चालतं, तेथे पाणी असेल तर ते कोणत्या स्वरुपात असेल याचा शोध आता आम्ही ‘पारकर सन प्रोब’ यानाद्वारे घेण्याचा प्रयत्न करत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या