पार्ले टिळक विद्यालयाचं 100व्या वर्षात पदार्पण, कार्यक्रम फेसबुक लाईव्हवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

9 जून 2020 रोजी पार्ले टिळक विद्यालय, आणि त्याचबरोबर पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन (PTVA) ही संस्था, शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. मात्र या वेळी कोरोनाचे संकट लक्षात घेत कार्यक्रमात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना सहभागी होता येईल.

शाळेच्या सुरुवातीपासून दर वर्षी 9 जून रोजी PTVAच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य आणि PTVA संचालित करत असलेल्या शैक्षणिक संस्थांचे प्रमुख लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांची स्मृती जपतात. त्यात 100 व्या वर्षात पदार्पण हा तर शाळेसाठी आणि PTVAसाठीही विशेष महत्त्वाचा टप्पा असल्याने पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या लौकिकाला साजेल असा कार्यक्रम आखण्यात आला होता. मात्र सद्य:स्थिती लक्षात घेत PTVAच्या व्यवस्थापक मंडळाने या वर्षी सध्याच्या अपवादात्मक परिस्थितीला साजेल अशाच पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत साधेपणाने या वर्षाची सुरुवात करायची ठरवले आहे.

संस्थेच्या www.parletilakvidyalayaassociation.com
या संकेतस्थळाचा वेळोवेळी वापर करून शाळा व PTVAसंचालित इतर सर्व शैक्षणिक संस्था यांच्या पुढील वाटचालीसाठी PTVAने योजलेल्या अनेक प्रकल्पांची आणि कार्यक्रमांची माहिती दिली जाईल.

कार्यक्रमाची वेळ मंगळवार 9 जून 2020 सकाळी 9 वाजता संस्थेच्या Facebook page तसेच YouTube Channel ना subscribe करण्यासाठी खालील लिंक्सवर click करा.

https://www.youtube.com/channel/UCm84G7K_lQrLDJexiQt8QLQ

https://m.facebook.com/ParleTilakVidyalayaAssociation/?ref=bookmarks