
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. आधी कृषी विधेयक चर्चेविना मंजूर करून घेण्यावरून आणि नंतर 12 खासदारांचे निलंबन झाल्यावर. प्रत्यक्षात ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर या अधिवेशनात कारवाई करण्यात आली आहे. हे निलंबन पूर्णपणे नियमांच्या विरोधात असल्याचे विरोधी पक्षाच्या खासदारांचे म्हणणे आहे. गोंधळ घालणाऱ्या सदस्याला उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित केले जाते आणि पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टला संपले, त्यामुळे या अधिवेशनातील निलंबन चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विरोधी पक्षाचे खासदारही संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार घालत असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांनी आपल्या वागणुकीबद्दल माफी मागितल्यास निलंबन मागे घेण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे म्हटले आहे.
दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची राज्यसभेत सकाळी 10 वाजता मल्लिकाअर्जुन खरगे यांच्या कार्यालयात बैठक होणार आहे. त्याच वेळी, TMC च्या खासदारांची बैठक त्यांच्या कार्यालयात 10.15 वाजता संसद भवनात स्वतंत्रपणे होत आहे. हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरणे हा दोन्ही बैठकांचा उद्देश आहे. सोमवारी काँग्रेसच्या बैठकीतही टीएमसी सहभागी झाली नाही. एवढेच नव्हे तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने शेतकऱ्यांच्या संदर्भात गांधी पुतळ्यासमोर स्वतंत्रपणे निदर्शने केली.
खासदाराने माफी मागितल्यास निलंबन मागे घेण्याचा विचार : संसदीय कामकाजमंत्री
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवातच ‘गदारोळाने’ झाली आहे. राज्यसभेतील 12 खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी खासदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत विरोधी खासदारांचे म्हणणे आहे की, निलंबन पूर्णपणे नियमांच्या विरोधात आहे. या संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचे ते बोलत आहेत, त्यानंतर आता संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांनी आपल्या वागणुकीबद्दल माफी मागितल्यास निलंबन मागे घेण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे म्हटले आहे.
रणनीती तयार करण्यासाठी काँग्रेसने विरोधकांची बैठक बोलावली आहे
रणनीती तयार करण्यासाठी काँग्रेसने विरोधकांची बैठक बोलावली आहे. आतापर्यंत मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी (काँग्रेस), एनके प्रेमचंद्रन, टीआर बाळू (द्रमुक) आणि फौजिया खान (राष्ट्रवादी) या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पोहोचले आहेत.





























































