
सामना प्रतिनिधी। पारनेर
नगर पुणे महामार्गावरील जातेगाव घाटाजवळील हॉटेल जयराजवर मंगळवारी रात्री बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या डान्स बारवर सुपे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 10 जणांना अटक करण्यात आली. तर सात बारबालांना ताब्यात घेण्यात आले, मात्र बुधवारी दुपारी समज देत, वैदयकिय तपासणी करून त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. हॉटेलचा मालक तसेच चालक पळून जाण्यात यशस्वी झाले.
जयराज हॉटेलमध्ये बारबालांना बोलवण्यात येते व नाचगाण्याच्या पाटर्या रंगवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याबाबत पो. निरीक्षक राजेंद्र भोसले यांना माहीती देण्यात आल्यानंतर भोसले यांच्यासह सहकारी कर्मचा-यांनी हॉटेलवर छापा टाकला. यावेळी ग्राहकांची झडती घेत त्यांच्याकडील मुददेमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिसांनी अटक केलेले आरोपी व त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली रक्कम पुढीलप्रमाणे ः सययद नासेर सययद इस्माईल वय 40 (रू. 7 हजार 700),अमोल सुभाष वरकड वय 41 (रू.1 हजार 515), संजय विठठलराव जाधव वय 48 ( रू.13 हजार 300), वाल्मिक विठठलराव क्षिरसाठ वय 40 (रू. 5 हजार 200), प्रदिप सत्यनारायण नावणकर वय 41 (रू.6 हजार 370), प्रशांत अण्णासाहेब पाटील वय 40 (रू. 6 हजार 200), संदीप देवीदास साबणे वय 39 ( रू. 8 हजार 600) सर्व रा. गंगाापूर, जि. औरंगाबाद, सारंधर शंकरराव जाधव वय 32 (रू. 120) रा. कासोडा, ता. गंगापूर. जि. औरंगाबाद. तसेच नृत्यंगणांवर उधळण्यात आलेले 17 हजार 400, 15 हजार रूपये किमतीचे अल्टो कंपनीचे स्पिकर, 15 हजार रूपये किमतीचा लॅपटॉप, 4 हजार रूपये किमतीचे लाईट व साउंड मिक्सर, 1 हजार रूपये किमतीचे दोन माईक व लाईट बोर्ड असा एकूण 1 लाख 1 हजार 404 रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
हॉटेलचा व्यवस्थापक कृष्णा सुर्याजी तोबरे वय 24 रा. लातूर तसेच ऑर्केस्ट्राचा चालक अजित बंडोपंत कदम वय 44 रा. लोहगाव, पुणे यांनाही अटक करण्यात आली. हॉटेल मालक राजेंद्र सातव, हॉटेलचा चालक नितीन शेटटी हे फरार झाले. महाराष्ट्र उपहार गृहे आणि मदयपान कक्षामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबतचा अधिनियम सन 2016 अन्वये या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पो. निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहा. फौजदार तुकाराम काळे, पठाण, पो. ना. दगडू शेरकर, साहेबराव ओहळ, जिवन शेरकर, छबू कोतकर, रियाज पटेल, कल्याण लगड, भाऊ शिंदे, जया ढोरजकर, शबाना तांबाळी, संगिता शिंदे यांचा समावेश होता. आरोपींना बुधवारी पारनेरच्या न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली.































































